लुईस ब्राऊन
पहिली मानव टेस्ट ट्युब बेबी
जन्मदिन – २५ जुलै १९७८
लुईस ब्राऊन ही आयव्हीएफ(IVF) तंत्राचा उपयोग करून जन्माला आलेली पहिली मानव टेस्टट्यूब बेबी आहे.
IVF ( In Vitro Fertilization) म्हणजेचं टेस्ट टयूब बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात मध्ये एक पाळी येते आणि दुसऱ्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये 2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.