कै. डाॅ. आप्पासाहेब पवार अमृतकुंभ
नाशिक शहरापासून अवघ्या 30 किलोमीटरवर एखादं गाव पाणी टंचाईग्रस्त असू शकतं यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. पण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव गेली अनेक ऊन्हाळे भिषण पाणी टंचाईचा सामना करत होतं. अशा परिस्थितीत सापगाववासीयांनी सोशल नेटवर्कींग फोरमकडे संपर्क साधला. गावच्या पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास करुन फोरमने यावर ऊपाय शोधला. प्रकल्प पुर्णत्वाला आवश्यक निधीसाठी आवाहन करताच फोरमचे दिवंगत मार्गदर्शक कै.डाॅ. आप्पासाहेब पवार यांचे कुटूंबिय त्वरीत पुढे आले आणि त्यांनी सापगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 3 लाख रुपये ऊपलब्ध करुन दिले.
आप्पासाहेब फोरमसोबत काम करत होते तेंव्हा त्यांचे आम्हाला मार्गदर्शन तर होतेच पण महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अनेक संस्थाकडून फोरमला आर्थिक सहयोगही मिळवून दिला. ते गेल्यावरही त्यांच्या कुटुंबियांनी सापगावला टंचाईमुक्त करण्यासाठी फोरमच्या पाठीशी ऊभे राहून त्यांचा वारसा जपला आहे ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकल्प आता पुर्णत्वास पोहोचला असून गावात पाणी पोहोचल्याचे आम्हाला अतिशय समाधान आहे.
स्थळ – सापगाव, ता. त्र्यंबकेश्वर (त्र्यंबकपासून जव्हार रस्त्यावर 8 किलोमीटर)